गुरुवार, २० जुलै, २०२३

.......झोप एक अविस्मरणीय आठवण ...............

 

 

आज रात्री झोपण्या करिता बेड मध्ये पडलो..हल्ली मन भविष्यातच असते बर्याच वेळा विचारांत रात्रीचे  १२.०० कधी वाजतात कळत नाही. पण आज मोबाईल जवळ नव्हता  .अचानक बालपणाची झोपण्याची किस्से , आठवणी आठवल्या म्हणून हा मोडका - थोडका अनुभव कथन ......................

म्हणतात भारतात ५ -६ लाख खेडी आहेत .माझ गाव म्हणजे त्यापैकीच काही वेगळे नव्हत. मी लहान म्हणजेच ५-६ वर्षाचा होतो त्यासुमारास असतील ७० – ८० घरे त्यापैकी १०० % घरे कच्चे व मातीचे बांधकाम असलेली होती (तेवढी शाळेची इमारत वगळून). बालमनाला आठवते तेवढ जर सांगायला गेलो तर.तो पर्यंत सिमेंटची जंगल गावात झाली नव्हती.प्रत्येक घरासमोर घराच्या ५ ते  १० पट जागा मैदान किंवा पटांगण होती.बर्याच घरी पंखे वा कूलर असली झंझट नव्हती.तरी खेळती हव्यामुळे त्यांची गरजच भासली नाही.

उन्हाळ्यात मस्त आभाळाचं छायेत मोकळ्या जागेत किंवा मांडवावर ५ -६ लोकांच्या समूहांने  झोपायचो मोबाईल त्या काळी नसल्यामुळे बर्याच गप्पा टप्पा, खेळ आणि अचानक ठरलेला बेत ...रात्री रानात फिरायला जाने इ. व्हायच.पहाटेची झोप तर अहः न्यारीच फार ८.०० वाजेपर्यंत गुलाबी थंडीच.परंतु या गुलाबी झोपेला हेवा लागायचा तो म्हणजे माझ्या आजोबांसह इतर आजोबांना बहुतेक सर्वच शेतकरी कुटुंबीय असल्यामुळे त्यात आजोबा म्हणजे सिनियर शेतकरी सर्व कामाची चिंता त्यांनाच ..भल्या पहाटे माझी /आमची झोप मोड करून सकाळची कामे उदा.बैल बांधणे,गुर ढोरे गोठ्याच्या बाहेर काढणे.किंवा डुकरांना चारायला जंगला जवळ घेवून जायचं........खूप जीवावर यायचं पण आम्ही जिथे झोपायचो ती  मोक्याची जागा होती.खेटूनच पाण्याचे बोरवेल होते पहाटे पहाटेच अख्क गाव पाणी भरायला यायचा आणि त्यात आमचे आजोबा जोर जोराने आवाज चढवून टीपिकॅल गोंडी भाषेत शिव्या द्यायचे....ते एकून माझेच काय माझ्या सर्व सवंगडीनची गुलाबी झोप पूर्ण खराबी व्हायची. आज आजोबां हयात नाहीत पण जुन्या  आठवणी निघाल्या की मित्रांमध्ये अजूनही आजोबांची नाव निघतोच.


थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी शेजारी झोपायचो अगोदर शाळेतून किंवा कामावरून परत आलो की आई -वडिलांचा दम दिलेला असायचा की काड्या किंवा खोड जमा करून शेकोटी तुझ्याकडून पेटवली गेलीच पाहिजे तेही आम्ही येण्या अगोदर.आणि पेटलेली दिसल नाही तर एक दोन फटके होतेच होते.दिवस भराच्या कामानन्तरच्या थकव्या मुळे भरपूर जेवण करून आई ने लहान पणी ऐकलेल्या जुन्या कथा गोंडी मध्ये (पीट्टो-सुरुवात पीट्टो पीट्टो दादी उंद मत्ता .....अशी सुरुवात असायची )ती एकत झोपायचो.  शेकोटी जवळ नाहीतर सोबत खाटेखाली निवे (पेटलेली कोळसा )फुटक्या कौलांरु मध्ये ठेवायचो तेवढ्यापुरती उब राहून मस्त झोप लागायची.आजच्या पिढीत ती मजाच हरवली!....प्रत्येक व्यक्ती मोबाईल मध्ये असतो ... बर्याचदा हिवाळ्यात शेतामध्ये चना,मुंग असायचा किंवा नदी शेजारील शेतामध्ये मिरची ,वांगे, तत्सम भाजीपाले लावलेली असायची मग वयस्क आजी -आजोबा म्हतार्यानसोबत शेतामधील झोपडीत रात्रीचा  मुक्काम राहायचा...निसर्गाचा सान्निध्यात वर मोकळा आकाश पक्षांची किलबिल,मध्येच कोल्हेकुई,शेजारील वाहत असलेल्या नदीचा खळखलाट आवाज कधी झुळूक वारे  आणि  हे एकत  झोपी जाणे म्हणजे एक परम अनुभव.आता कुठे माझ्या नशिबी....आता फक्त चार भिंती छत आणि मी ...........क्रमश ..........!.....आता पावसाळा कधी आठवत ...काय माहित?

.......झोप एक अविस्मरणीय आठवण ...............

    आज रात्री झोपण्या करिता बेड मध्ये पडलो..हल्ली मन भविष्यातच असते बर्याच वेळा विचारांत रात्रीचे   १२.०० कधी वाजतात कळत नाही. पण आज मोबाई...